सुधीर मुंगसे यांचा पाठपुरावा यशस्वी; कुरुळी गाव होणार ‘पाणीदार’!

सॅनी हेवी कंपनीकडून कुरुळीच्या पाझर तलावासाठी १ कोटी ६० लाखांचा सीएसआर निधी

आळंदी देवाची (जि. पुणे ): कुरुळी गावातील भीषण पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून सुधीर मुंगसे यांचा पाठपुरावा यशस्वी झाला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे सॅनी हेवी या नामांकित कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व (CSR)निधीतून कुरुळी गावातील पाझर तलावाच्या पुनरुज्जीवन कामासाठी १ कोटी ६० लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. गुरुवारी दि. १६ एप्रिल रोजी या निधीतून पाझर तलावाचे पुनरुज्जीवन, संरक्षण भिंत आणि सुशोभीकरण अशा विविध कामांचा शुभारंभ ज़िल्हा परिषद सदस्य विनया मुंगसे यांच्या हस्ते करण्यात आला.

कुरुळी परिसरात एमआयडीसीमुळे वाढलेली लोकवस्ती आणि खालावलेली भूजल पातळी यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. भविष्यातील गरज ओळखून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुधीरभाऊ मुंगसे यांनी सॅनी हेवी कंपनीकडे या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडत कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून गावातील पाणी प्रश्नासाठी मदत करण्याची विनंती केली होती. या जनहिताच्या कामासाठी सॅनी हेवी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकारत्मक प्रतिसाद आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर आता तलावाच्या खोलीक्रनासह इतर कामांना सुरुवात करण्यात आली आहे. तलावाच्या सुरक्षिततेसाठी मजबूत संरक्षण भिंत आणि परिसराच्या सुशोभीकरणाचे कामही या निधीतून केले जाणार आहे. या उपक्रमामुळे कुरुळी गाव लवकरच ‘पाणीदार’ होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रकल्पामुळे तलावातील अनेक वर्षांचा साचलेला गाळ काढल्या जाणार आहे. त्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ज्यामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या भूजल पातळीत मोठी वाढ होणार होऊन ग्रामस्थांची पाण्याची भीषण टंचाई दूर होण्यास मदत मिळेल, सामाजिक बांधिलकीतून कुरुळी गावाच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सॅनी हेवी कंपनीचे आणि संबधित अधिकाऱ्यांचे सुधीर मुंगसे यांनी आभार मानले.

याप्रसंगी ज़िल्हा परिषद सदस्य विनया मुंगसे , कुरुळी ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व पदाधिकारी, मी सेवेकरी सोशल फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.