संगमनेर : शहराचा वाढता विस्तार, दाट लोकवस्ती आणि अनेक भागांतील अरुंद रस्ते लक्षात घेता आग अथवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत मोठी अग्निशमन वाहने वेळेत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाकडून प्राप्त झालेले अत्याधुनिक ‘फोर्स गुरखा’ मिनी फायर टेंडर आता संगमनेर नगरपालिकेच्या सेवेत दाखल झाले आहे.

या विशेष बचाव वाहनाचे अनावरण आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

संगमनेर शहराचा सुनियोजित विकास करताना नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडून सातत्याने केला जात आहे. विशेषतः शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात आग किंवा इतर दुर्घटना घडल्यास तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी लहान पण सक्षम अग्निशमन वाहनाची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी प्रशासनाकडे वारंवार मांडले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे हे मिनी रेस्क्यू टेंडर पालिकेच्या ताफ्यात दाखल झाले आहे.

यावेळी बोलताना डॉ. मैथिली तांबे यांनी, “नागरिकांचे प्राण आणि मालमत्ता सुरक्षित राखणे ही आमची प्राथमिकता असून शहराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगितले.

दरम्यान, संगमनेरला अधिक सुरक्षित आणि सक्षम शहर बनवण्यासाठी भविष्यातही आधुनिक सुविधांची मालिका सुरू राहील, अशी ग्वाही आमदार सत्यजीत तांबे आणि नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.