पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार ; सुधीर मुंगसे यांचा इशारा”

पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या चर्चेमुळे राज्यभरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असताना खेड तालुक्याचे नेते सुधीर मुंगसे यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत पुढाकार घेतला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी आंदोलने, निवेदने आणि सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांनी या प्रकल्पाला मोठा पाठिंबा दिला होता. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर अचानक प्रकल्प थांबवण्याची चर्चा सुरू झाल्याने महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे.

विशेषतः पुणे – नाशिक प्रकल्प रखडत असताना अहमदाबाद – ढोलेरा सेमी हायस्पीड प्रकल्पाला गती दिली जात असल्याने केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजगुरुनगर – चाकण हा लोकहिताचा आणि सरळ मार्ग असताना तो डावलण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन उभे राहील, असा इशारा सुधीर मुंगसे यांनी दिला आहे.

“हा फक्त रेल्वे प्रकल्प नसून युवकांचे भविष्य, शेतकऱ्यांचे हक्क आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे,” असे स्पष्ट मत सुधीर मुंगसे यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.