शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांवर आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतली उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची भेट!
मुंबई : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न, संस्थांच्या अडचणी तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताशी संबंधित विषयांसंदर्भात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व अनुदानासंदर्भातील प्रश्न, ग्रंथालय क्षेत्रातील रिक्त पदे, वेतनवाढ व सेवा सुविधांबाबतच्या मागण्या तसेच कला शिक्षण मंडळाच्या Academic Monitoring प्रक्रियेतील अडचणी याकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. याशिवाय सल्लामसलत प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थापनाबाबत पुनर्विचार करण्याची मागणीही करण्यात आली.
मंत्री महोदयांनी सर्व विषयांची सकारात्मक दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करत असून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांच्या हितासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.