शिक्षण क्षेत्रातील अनागोंदीविरोधात सत्यजीत तांबे आंदोलनाचा इशारा : संदर्भात घेतली शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट!

मुंबई:- राज्यभरातील शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर आता निर्णायक भूमिका घेण्यात येणार असल्याचे संकेत आमदार सत्यजीत तांबे यांनी दिले आहेत. आज त्यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेत शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.

दि. २१ मे रोजी शिक्षण आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरही आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्या, शिक्षकांच्या मागण्या आणि प्रलंबित विषयांबाबत मंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास दि. २५ मे रोजी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यावर मंत्री दादाजी भुसे यांनी “आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही,” असा सकारात्मक प्रतिसाद देत प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे संकेत दिले.

दरम्यान, रविवारी नाशिक येथे आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र विभागीय शिक्षण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, प्रशासनातील अनागोंदी तसेच पुढील आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.