केळगाव पाझर तलावाची जि. प. सदस्य.विनया सुधीर मुंगसे यांच्याकडून पाहणी; दुरुस्तीचे तातडीचे आदेश
केळगाव (प्रतिनिधी): सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे केळगाव येथील पाझर तलाव फुटल्याची घटना घडली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषद सदस्य विनया सुधीर मुंगसे (कुरुळी–आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट) यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी तलाव फुटल्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच पाटबंधारे विभागाने दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घेऊन नुकसानग्रस्त भाग सुरक्षित करण्याचे निर्देशही देण्यात आले.
पाहणीदरम्यान तलावाच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रशासनाच्या समन्वयातून आवश्यक ती सर्व मदत नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
या पाहणीवेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामसेवक, स्थानिक अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.