“शाळा परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर बंदी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश”

राज्यात शाळांच्या ५०० मीटर परिसरात उच्च कॅफिनयुक्त ‘स्टिंग’सारख्या ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदीचे निर्देश

*“शाळा परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर बंदी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश”*

*राज्यात शाळांच्या ५०० मीटर परिसरात उच्च कॅफिनयुक्त ‘स्टिंग’सारख्या ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदीचे निर्देश*

मुंबई, दि. ०३ जुलै २०२६ : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर ठरू शकणाऱ्या ‘स्टिंग’सारख्या उच्च कॅफिनयुक्त ऊर्जा पेयांच्या विक्रीवर शाळांच्या ५०० मीटर परिसरात बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यात घेण्यात आला आहे. हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी विधानपरिषदेत ठाम भूमिका घेत आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

या संपूर्ण मुद्द्यावर बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी वारंवार विधानपरिषदेत स्पष्टपणे मांडले की शाळा परिसरात अशा प्रकारच्या ‘हाय कॅफिन’ आणि आकर्षक पॅकेजिंग असलेल्या पेयांची सहज उपलब्धता ही विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. “शालेय वयातील मुलांमध्ये अशा पेयांचे वाढते सेवन चिंताजनक असून, यावर तातडीने निर्बंध आवश्यक आहेत,” अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात घेतली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले.

तांबे यांनी हा मुद्दा केवळ एका चर्चेपुरता मर्यादित न ठेवता अनेक वेळा सभागृहात उपस्थित करत धोरणात्मक निर्णयाची मागणी लावून धरली. शाळांच्या परिसरात आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याची मागणीही त्यांनी सातत्याने केली होती.

अखेर या मागण्यांना यश मिळत शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’सारख्या ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदीचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या संदर्भात मंत्री नरहरी झिरवळ यांनी संबंधित निर्देश दिल्याची माहिती आहे. या निर्णयाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या पेयांवर केवळ शाळा परिसरापुरती मर्यादा न ठेवता राज्यस्तरावर कठोर आणि सर्वसमावेशक धोरण आखण्यात यावे, अशीही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी अधोरेखित केली आहे.

*आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याची नोंद -*

📌 दि. १२ जुलै २०२४ रोजी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला.

📌 दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी यासंदर्भात अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या तत्कालीन मंत्री महोदयांना पत्र लिहून शाळांच्या परिसरातील कॅफेनयुक्त पदार्थांच्या विक्रीबाबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली.

📌 दि. २३ जानेवारी २०२५ रोजी अन्न व औषध विभागाचे मा. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

📌 दि. २९ जानेवारी २०२५ रोजी अन्न व औषध विभागाचे मा. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली, या बैठकीत एनर्जी ड्रिंक्सवरील संभाव्य धोरण, जनजागृती अभियान आणि निर्बंध लागू करण्याच्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली.

📌 दि. १ जुलै २०२५ रोजी पावसाळी अधिवेशनात स्टिंगसारख्या घातक एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्यात यावी, यासाठी पुन्हा एकदा आवाज उठवण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.