गुरुनानक जयंतीनिमित्त आमदार सत्यजीत तांबे यांची संगमनेर गुरुद्वारात भेट
“गुरुनानकांचा शांततेचा आणि समानतेचा संदेश आजही आपल्याला मार्गदर्शन करतो” — आमदार तांबे
गुरुनानक जयंतीनिमित्त आज आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहरातील गुरुद्वाराला भेट देऊन शिख तसेच पंजाबी बांधवांना शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी गुरुनानकांच्या शिकवणीचा उल्लेख करत समाजात शांतता, समानता आणि न्याय यांचे महत्व अधोरेखित केले.
यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले, “गुरुनानकांची ५५६ वी जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांची आठवण करणे म्हणजेच सत्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा घेणे होय. त्यांनी या देशाला एकतेचा आणि प्रेमाचा संदेश दिला. अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याचं बळ त्यांच्या शिकवणीत आहे.”
ते पुढे म्हणाले, “दहा गुरूंनी आपल्या काळात समाजाला वेगवेगळे पण मूल्यप्रधान संदेश दिले. त्यामुळेच शिख समाज आज जगभरात उल्लेखनीय कामगिरी करत आहे — मग ते राजकारण असो, समाजकारण किंवा व्यवसाय. हीच गुरुनानकांच्या विचारांची खरी देण आहे.”
“मी तमाम संगमनेरकरांना गुरुनानक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या शिकवणीमधून आपण समाजात प्रेम, बंधुता आणि न्यायाचा विचार पुढे नेऊया.”
~आमदार सत्यजीत तांबे.