विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळांनी घेतली मा आ.आहेरांची भेट, मनमाडच्या कॉग्रेसच्या नगरसेवकांनी दिला पाठिंबा

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून नांदगाव तालुक्यात इच्छुक उमेदवारांनी विविध राजकीय पक्षांच्या जेष्ठ नेते मंडळींच्या भेटीगाठी घेण्याचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी करत असलेले समीर भुजबळ यांनी तालुक्याचे माजी आमदार अनिल आहेर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने विविध राजकीय क्षेत्रातील काम करणारे कार्यकर्ते आणि जेष्ठ नेत्यांच्या भुवया उंचावल्या असल्याचे चित्र दिसत आहे.

याप्रसंगी समीर भुजबळांचा माजी आ अनिल दादा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दर्शन आहेर यांनी समीर भुजबळ यांचा सन्मान केला, या वेळी झालेल्या चर्चेत आपण नांदगाव-मनमाड मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज नांदगाव येथे माजी आमदार मा. अनिलदादा आहेर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच भयमुक्त व विकासयुक्त नांदगाव करण्याच्या आपल्या मोहिमेसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन घेतले.

याप्रसंगी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, मी उमेदवारी जाहीर केल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे नेते तसेच नगरसेवक इत्यादींनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला असून मनमाड येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संजय निकम, नगरसेवक संतोष अहिरे, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार यांनी समीर भुजबळ यांची भेट घेत भयमुक्त नांदगाव तालुका व नांदगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपणास जाहीर पाठींबा देत असल्याचे सर्व नगरसेवकांनी सांगितले.

तालुक्यातील माजी माजी आमदार अनिल दादां सारख्या ज्येष्ठ व्यक्तीमत्वाचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन माझ्या साठी नक्कीच खूप मोलाचे ठरणार आहेत, असे मत श्री. समीर भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.