कुरुळी-आळंदी जि.प. गटाच्या विनया सुधीर मुंगसे यांची बांधकाम समितीवर निवड
पुणे : कुरुळी-आळंदी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सौ. विनया सुधीर मुंगसे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सौ. मुंगसे या गेल्या काही वर्षांपासून स्थानिक पातळीवर सक्रिय राहून विविध विकासकामांमध्ये पुढाकार घेत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांची बांधकाम समितीवर निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यांचे पती श्री. सुधीर मुंगसे हे ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून खेड – आळंदी तालुक्यात सामाजिक कार्य करत असून, त्यांच्या सेवाभावी कार्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे. समाजाभिमुख उपक्रमांमुळे त्यांनी अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
सौ. मुंगसे यांच्या या यशाबद्दल कार्यकर्ते, नागरिक आणि विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.