नाशिक पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम २००९ साली डॉ. सुधीर तांबे यांनी करून दाखवलं, तेही पक्षाची साथ नसताना!
डॉ. सुधीर तांबे यांनी तेव्हा काँग्रेसकडून उमेदवारी मागितली, पण काही कारणामुळे त्यांना ती मिळू शकली नाही. परंतु डॉ. तांबेंनी न थांबता मोर्चे बांधणी सुरु केली, पाचही जिल्ह्यांचा झंजावाती दौरा केला आणि सर्व पदवीधर मतदारांना एक विश्वास दिला! ती निवडणूक त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढवली आणि जिंकून सुद्धा आले. पण जिंकून आल्यानंतर मात्र ते पुन्हा काँग्रेससोबतच राहिले. ही आहे खरी पक्षनिष्ठा आणि हे आहे आपल्या पक्षाबद्दलचं खरं प्रेम! वेळ काळ परिस्थितीनुसार काही वेगळी पावले उचलावी लागतात. पण विजयानंतर त्यांनी काँग्रेसला सोडलं नाही, हे जास्त महत्त्वाचं!
त्यानंतर २०११ व २०१७ या पुढच्या दोन्ही निवडणुकांमध्ये सलग त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि ते चांगल्या मताधिक्याने निवडूनही आले. नाशिक पदवीधर मतदारसंघाची बांधणी करत असताना सत्यजीत तांबे यांचीही त्यांना मोलाची साथ मिळाली. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. संघटनात्मक बांधणी असेल, पक्षीय संघटना बांधण्याचे काम असेल किंवा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद असेल, सत्यजीत तांबेंनी नेहमीच चांगलं काम केलं.
यंदाच्या निवडणुकीच्या वेळी मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघासह पूर्ण महाराष्ट्रातून सत्यजीत तांबेंना उमेदवारी मिळावी, अशी मागणी व्हायला लागली. फक्त मतदार, युवा कार्यकर्ते, तरुणच नव्हे तर काँग्रेसचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेते सुद्धा या उमेदवारासाठी अनुकूल होते. पण पक्षातल्या काही अंतर्गत लोकांमुळे, अंतर्गत विरोधकांमुळे सत्यजीत तांबे यांना उमेदवारी मिळू शकली नाही. पण जनभावना महत्त्वाची आहे आणि त्या जनभावनेचा आदर आपण केला पाहिजे, या भावनेतून डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांनी पावले उचलली. जनभावनेचा आदर करतानाच त्यांनी पक्षाची मर्यादाही जपली. कारण त्यांनी ठरवलं असतं तर त्यांना भाजपकडूनही उमेदवारी अर्ज भरता आला असता. भाजपच्या नेतृत्वाकडून त्यांना खुली ‘ऑफर’ होती, हे अवघ्या महाराष्ट्राने बघितलंय. पण त्यांनी ती गोष्ट केली नाही, अपक्ष फॉर्म भरण्याचा मार्ग निवडला. अपेक्षा फॉर्म भरणं ही केवळ एक तांत्रिक बाब आहे. कारण त्यांची काँग्रेस विचारांवरील निष्ठा व काँग्रेससाठी केलेलं काम सर्वज्ञात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाबद्दलचं त्यांचं प्रेमही त्यांनी जपण्याचा प्रयत्न केला. जनभावना आणि पक्षनिष्ठा या दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन चालणारं हे नेतृत्व आहे.
विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, राज्यातील नेते, राष्ट्रीय स्तरावरील नेते या सर्वांनी त्यांना फोन करून खासगीत त्यांचं अभिनंदन केलं, शुभेच्छाही दिल्या. पण पक्षातीलच काही लोकांना त्यांचा पोटशूळ आहे, हे आपण पहिल्यापासूनच पाहत आलो आहोत. असो.
सत्यजीत तांबे यांच्यासाठी लोकसेवा महत्त्वाची आहे आणि त्यांना पदवीधरांचा आवाज आणखी बुलंद करायचा आहे. त्यांना लोकसेवेचा मोठा वारसा आहे. सोबतच दूरदृष्टी, एक नवा दृष्टिकोन आणि नवभारत घडवण्याचा निश्चयसुद्धा आहे. त्यामुळे ते नक्कीच चांगलं काम करून दाखवतील, असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला आहे आणि हा विश्वास ते नक्कीच सार्थ ठरवतील.
सत्यजित बहुमताने विजयी होतील. मतादरसंघाय दुसरा उमेदवार नाही.