माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती सोहळा व भव्य शोभा यात्रा उत्साहात संपन्न

नाशिक,दि.११ एप्रिल :- क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने फुले स्मारक मुंबई नाका येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी फुले दांपत्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पालखीचे व रथाचे पूजन करत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात व फटक्यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आदिवासी सांस्कृतिक नृत्य हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.

सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत मुंबई नाका फुले स्मारक येथील पुतळ्यास जयंतीनिमित्त सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुतळ्याभोवती असणाऱ्या आकर्षक सजावटीमुळे सर्वाच्या डोळ्याचे पारणे फिटले. तसेच 20 x 60 च्या भव्य स्क्रीनवर क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या संघर्षाची माहिती व त्यांचा जीवनपट बघून उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले होते.

मुंबई नाका येथील फुले स्मारक येथून संध्याकाळी मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ.शोभा बच्छव, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सत्यजित तांबे, सीमाताई हिरे, माजी आमदार वसंत गिते, जेष्ठ नेते दिलीप खैरे, नानासाहेब महाले, सुनिल बागूल, दत्ता गायकवाड, प्रकाश लोंढे, बाळासाहेब कर्डक, शिवसेना जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधूने, शिवसेना महानगरप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, गणेश गिते, विनायक पांडे, आकाश छाजेड, नाना शिलेदार, नगरसेविक राहुल दिवे, अर्चना थोरात, नयना गांगुर्डे, कविता कर्डक, संजय साबळे, दिनकर पाटील, गजानन शेलार, गोरख बोडके, गोकुळ पिंगळे, महेश हिरे, निवृत्ती अरिंगळे, अनिल जाधव, महेश हिरे, मामा राजवाडे, प्रथमेश गिते, बाजीराव तिडके, बाळासाहेब जानमाळी, प्रेरणा बलकवडे, समाधान जेजुरकर, गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, अजित लेनकर, नीलिमा सोनवणे, मनोहर कोरडे,अमर वझरे, प्रा ज्ञानेश्वर दराडे, मिलिंद भालेराव, प्रसाद सोनवणे, अमोल नाईक आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मिरवणुकीत राममुक्ती मित्र मंडळ, माळी महासंघ, जुने नाशिक मित्र मंडळ, निर्मिक फाउंडेशनचे चित्ररथ होते. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात विविध मंडळाचा लक्षणीय सहभाग दिसून आला. प्रत्येक मंडळाचा विविध देखाव्याचा साधारणपणे २० चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. उत्सव समितीच्या वतीने या भव्य मिरवणुकीत महात्मा ज्योतीराव व सावित्रीबाई फुले तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या देखाव्याची घोडा बग्गी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. जीवंत देखावा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. यावेळी मिरवणूक मार्गातील विविध पुतळ्याना अभिवादन करण्यात आले. तसेच पारंपारिक भव्य ढोल पथक, लेझिम पथक, बँड पथकासह महात्मा फुलेंची पालखी काढण्यात आली. महिलानी फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा जल्लोष केला.

यावेळी मिरवणुकीतील महिला व पुरुषांनी डोक्यावर फेटे परिधान केले होते. यासह वारकरी संप्रदाय, आदिवासी नृत्यपथक, वासुदेव वेशभूषा असे विविध देखावे बघण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी, समाजबांधव व नाशिककर आपल्या कुटुंबांसह या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक मुंबई नाका फुले स्मारक, सारडा सर्कल, दूध बाजार, भद्रकाली, मेनरोड, धुमाळ पॉइंट, दहीपूल, संत गाडगे महाराज पुलावरून गणेशवाडी येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ रात्री पोहचली.

यावेळी येथे डोळ्याची पारणे फेडणारी भव्य-दिव्य आतिषबाजी करण्यात आली. महात्मा फुले जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी मंडळांनी डीजेला फाटा दिल्याचे चित्र पहावयास मिळाले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरातच मिरवणूक काढण्यात आली होती. यामुळे ध्वनिप्रदूषणाला निश्चितच आळा बसण्यास मदत होत आहे. नाशिककरांनी पाडलेला हा नवीन पायंडा पर्यावरणपूरक असल्याने उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, कार्यकारी अध्यक्ष शशी हिरवे, महिला अध्यक्ष तेजश्री काठे, कार्याध्यक्ष सचिन काठे, कार्याध्यक्ष संदिप गांगुर्डे, महिला कार्याध्यक्ष आशा भंदुरे यांचे नाशिककरांनी आभार मानले.

यावेळी उपाध्यक्ष सुरेश दलोड, किसनशेठ बल्लाळ, शंकर मोकळ, प्रमोद बनकर, संजय अभंग, संदीप बनकर, विशाल जेजुरकर, साहेबराव बनकर अमोल नाईक, गणेश खोडे, विनोद डोके, सचिन जगझाप, राकेश शेवाळे, राहुल घोडे, प्रफुल्ल वाघ, विकास सोनावणे, खजिनदार : संदिप खैरे सह खजिनदार स्वप्निल फुले, समिती समन्वयक शरद मंडलिक, शंतनू शिंदे, अरुण थोरात, मोहन माळी, सरचिटणीस : भास्कर जेजुरकर, ज्ञानेश्वर सोमासे, विलास वाघ, महेश ढोले, तुषार विधाते, चैतन्य खैरे, मुक्तेश्वर जाधव, सागर अभंग, विकी गायधनी, प्रसिद्धी प्रमुख : भालचंद्र भुजबळ, संतोष पुंड, शहर संघटक : दिनेश झुटे, किरण गीते, प्रभाकर शेलार, कुलदीप जेजुरकर, अजिंक्य हिंगमिरे, सतिश वाघ, विभाग प्रमुख पंचवटी रामेश्वर साबळे, आडगाव सचिन खोडे, मखमलाबाद, धनंजय थोरात, सातपूर विवेक सोनावणे, आनंदवली नरेश काळे, मध्य नाशिक नाना नाईकवाडे, गंगापूर रोड व्यंकटेश जाधव, सिडको रवींद्र शिंदे, इंदिरानगर संदीप जगझाप आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.