महात्मा फुले जयंतीच्या पूर्वसंध्येला समीर भुजबळांकडून फुले स्मारक येथे अभिवादन

नाशिक, १ १ एप्रिल : – क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला माजी खासदार समीर भुजबळ यांनी फुले स्मारक, मुंबई नाका येथे पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले.

महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने फुले स्मारक, मुंबई नाका येथे विशेष सजावट करण्यात आली होती. परिसराला फुलांच्या सजावटीने सजवण्यात आले होते तसेच विद्युत रोषणाईद्वारे उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते

माजी खासदार समीर भुजबळ यांनी या प्रसंगी महात्मा फुले यांनी समाजातील दलित, शोषित आणि स्त्रियांसाठी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा उल्लेख करताच, त्यांच्या विचारांचे पालन करून समतेच्या समाजाची निर्मिती करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “महात्मा फुले यांनी शिक्षण, समता आणि न्यायाच्या मार्गावर चालून समाज परिवर्तनाचा पाया घातला. आजही त्यांचे विचार प्रासंगिक आहेत आणि आपण सर्वांनी त्यांच्या आदर्शांना चिकटून राहिले पाहिजे.”

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षण, दलितोद्धार आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या कार्याचे या कार्यक्रमात विशेष उल्लेख करण्यात आले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी एकत्रितपणे फुले दाम्पत्यांच्या विचारांचा पुरस्कार करत समाजप्रबोधनाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प सर्वांनी केला.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, शहराध्यक्षा कविता कर्डक, प्रसाद सोनवणे, अमोल नाईक, आशा भंदूरे, शंकर मोकळ, नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, अमर वझरे, आकाश पगार, नाना साबळे यांसह अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.