मा. सुधीरभाऊ मुंगसे यांच्या पुढाकाराने नाशिक पुणे रेल्वेसाठी स्वाक्षरी मोहिमेला वेग

नाशिक–पुणे रेल्वे चाकण, खेड, राजगुरुनगर मार्गे सुरू व्हावी या मागणीसाठी खेड तालुक्यात स्वाक्षरी मोहिमेला वेग आला आहे. या मोहिमेचा पुढाकार खेड तालुक्याचे नेते मा. सुधीरभाऊ मुंगसे यांनी घेतला असून, नागरिकांमध्ये याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

“एक सही आपल्या हक्कासाठी… सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी!” या घोषवाक्याखाली राबवण्यात येणारी ही मोहीम सध्या खेड, चाकण आणि राजगुरुनगर शहरांमध्ये सुरू आहे. रेल्वेचा सरळ मार्ग या भागातून जावा, ही अनेक वर्षांची मागणी असून, या मागणीला बळकटी देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

या मोहिमेद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, स्थानिक विकासासाठी रेल्वे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मुंगसे यांनी सांगितले. नागरिकांनी स्वाक्षरीच्या माध्यमातून एकजूट दाखवून या प्रकल्पाला पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने लोक स्वखुशीने सहभागी होत आहेत. ही एकजूटच शासनापर्यंत पोहोचणारा प्रभावी आवाज ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.