नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी आता जनआंदोलन; आ. सत्यजीत तांबे यांचा इशारा

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग हा केवळ वाहतुकीचा विषय नसून नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी या मागणीसाठी आता व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, कार्यवाही न झाल्यास रोजी आंदोलन छेडण्यात येईल, असे तांबे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

तांबे यांनी सांगितले की, नाशिक-पुणे दरम्यान थेट रेल्वेमार्ग नसल्याने नागरिकांना मोठा वळसा घालावा लागतो. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो, वाहतुकीचा ताण वाढतो आणि उद्योग, शिक्षण तसेच रोजगाराच्या दृष्टीनेही नाशिकचे नुकसान होत आहे.

तसेच, समृद्धी महामार्ग आणि जोडरस्त्यांमुळे नाशिककरांना अपेक्षित लाभ मिळाला नसल्याची टीकाही त्यांनी केली. साकूर फाटा जोडरस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करत, नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून जनदबाव निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.