आमदार सत्यजीत तांबे हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कमालीचे चर्चेत आहेत. या चर्चेला कारणही तसंच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याने आमदार सत्यजीत तांबे यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर केलेली टिप्पणी.
ही काही ट्रोलिंगची टिप्पणी नसून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्याने समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर असं म्हटलं आहे की ते मनसेचे एक पुरस्कर्ते असून आमदार सत्यजीत तांबे यांचं काम नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतात. आमदार सत्यजीत तांबे हे पहिल्यांदाच निवडून आलेले लोकप्रतिनिधी असूनही अत्यंत हुशार व दूरदर्शी आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत अनुभवी नेत्यांना लाजवणारी आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते करत असलेले प्रयत्न प्रशंसनीय असून एका चांगल्या प्रोजेक्टवर आमदार सत्यजीत तांबे यांच्यासोबत काम करण्याची त्यांची इच्छा असल्याचं यात म्हटलं आहे.
पक्षीय राजकारणात एकमेकांचे कपडे फेडणारे कार्यकर्ते आपण राज्यात बघितले आहेत. मात्र आमदार सत्यजीत तांबे यांच्या कार्यपद्धतीमुळे राज साहेब ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते देखील आता त्यांचे फॅन बनले आहेत.
महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून आता मोठ्या अपेक्षा आहेत.