Satyajeet Tambe यांच्या पुढाकाराने Nashik-Pune Semi Highspeed Railway विषयी मुंबईत बैठक!

३ तारखेच्या सर्वपक्षीय कृती समिती बैठकीद्वारे लढा उभारण्याची तांबेंची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सरळ मार्गाने (सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-मंचर-राजगुरुनगर-चाकण) जावा, यासाठी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात ३ मार्च रोजी मुंबईत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पहिली बैठक होणार आहे.

या बैठकीचे आयोजन करण्याची मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली असून, आ. दिलीप वळसे पाटील, आ. माणिकराव कोकाटे, आ. शरद सोनवणे, आ. अमोल खताळ, आ. बाबाजी काळे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्व लोकप्रतिनिधींशी सत्यजीत तांबे यांनी फोनद्वारे चर्चा करून पत्र पाठवले आहे.

या बैठकीत रेल्वे मार्ग निश्चितीबाबत चर्चा करून केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. यापूर्वीही १ मार्च २०२४ रोजी या मार्गासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे हा महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा मार्ग अधिक सरळ आणि सोयीस्कर असावा, यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी मांडली आहे. “पहिल्या टप्प्यात ही चर्चा करून केंद्र शासनावर प्रभाव टाकण्याच्या दिशेने पुढील योजना ठरवली जाणार आहे,” अशी माहिती आ. सत्यजीत तांबे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.