Pune Nashik Semi Highspeed Railway – GMRT च्या प्रश्नांवर सत्यजीत तांबे यांनी नक्की काय तोडगा काढलाय ?

आपल्या प्रगतीची आणि भवितव्यासाठीच्या लढाईची वेळ आहे!

जीएमआरटी हा देशासाठी अभिमानास्पद प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाचं कारण पुढे करत महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा आणि पुणे-नाशिक शहरातील अंतर कमी करून केवळ 1 तास 45 मिनिटांवर आणणारा महत्त्वाकांक्षी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प थांबवणे ही केवळ रेल्वेची नव्हे, तर आपल्या प्रगतीची आणि भवितव्यासाठीच्या लढाईची वेळ आहे!

जीएमआरटीचा आधार घेऊन सरळ आणि कमी वेळ लागणारा रेल्वे मार्ग रद्द केला आहे. तसेच हा प्रकल्प नाशिक-शिर्डी-नगर मार्गे वळवला गेला असून प्रवासाचा वेळ 3 तास 30 मिनिटांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे नारायणगावजवळील जीएमआरटी प्रकल्पामुळे या भागातील प्रगतीला ब्रेक लागला आहे, असे असतांना या रेल्वे प्रकल्पासाठी आता कृती समिती स्थापन करून त्याद्वारे संघर्ष करण्याची गरज आहे.

शिर्डी, नगर मार्गे रेल्वे प्रकल्प वळवल्यावर या परिसरासह पुणे, नगर नाशिक या जिल्ह्यांच्या विकासाला खीळ बसेल. त्यामुळे पुणे आणि नाशिकच्या उज्वल भवितव्यासाठी, सिन्नर-संगमनेर-नारायणगाव मार्गावर एक बोगदा उभारून हा प्रकल्प मार्गी लावणे शक्य आहे, त्यामुळे रेल्वे सरळ मार्गे पण जाईल आणि प्रवासासाठी लागणारा वेळ देखील अवास्तव वाया जाणार नाही.

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच जावा, या आपल्या हक्कासाठी आणि आपल्या भागाच्या प्रगतीसाठी एकजुटीची आणि संघर्षाची वेळ आता आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.