खासदार कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

मी सेवेकरी सोशल फाउंडेशचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुधीर मुंगसे यांच्याकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन

राजगुरूनगर : शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य आणि रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे २५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ७० जणांनी रक्तदान केले.

खेड तालुक्यातील चास आणि वाफगाव या दोन गावात खासदार डॉ. कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मी सेवेकरी फाऊंडेशनचे सुधीर मुंगसे आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष हिरामण सातकर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

महाआरोग्य शिबिर चास आणि वाफगाव या गावांत करण्यात आले होते, याअंतर्गत चास, वाफगावसह कडधे,कान्हेवाडी-मोहकल-कमान,आखरवाडी-पापळवाडी-बहिरवाडी, चिंचबाईवाडी, वरुडे, वाकळवाडी, जऊळके, गुळाणी या गावातील नागरिकांना या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता आला.

यावेळी संजय घनवट युवा मंचचे अध्यक्ष संदीप घनवट, ग्रामीण महिला जिल्हा उपाध्यक्षा मनीषा सांडभोर, मंगल राक्षे, विशाल झरेकर, विशाल थिगळे, रोहिदास पवळे, सौरभ बरबटे, चासचे सरपंच विनायक मुळूक, उपसरपंच पूनम नवनाथ रासकर, चेअरमन वैभव राक्षे, व्हा.चेअरमन मच्छिंद्र मुळूक, सरपंच सविता विलास पोखरकर, मोहकलच्या सरपंच अश्विनी भागवत,चासचे माजी सरपंच अनिल टोके, नवनाथ वाळुंज, अनिल रहाणे, ज्ञानेश्वर मुळूक, माजी उपसरपंच जावेदभाई इनामदार, राजेंद्र घाटकर, ग्रामपंचायत सदस्य आशा टोके, सविता रहाणे, सविता टोके, सुनील वाळुंज, मच्छिंद्र मुळक, आखाररवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य नीलम मुळूक, कडधे गावचे सरपंच सचिन नाईकडे, कमानचे माजी सरपंच योगेश नाईकरे, मिरजेवाडी उपसरपंच आकाश वसंत बुट्टे,चासचे पोलीस पाटील वंदना रासकर, आखाररवाडीचे पोलीस पाटील नवनाथ मुळूक, संकेत टोके, धनंजय टोके, अभिजीत मुळूक, संदेश मुळुक, गिरीश रासकर तसेच वाफगाव येथील महारक्तदान शिबीरासाठी सरपंच नितीन लंगोटे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कराळे, माजी सरपंच राजेंद्र टाकळकर,विठ्ठल मुंगसे, हरिप्रसाद खळदकर, ऋषी सुर्वे, शरदराव थिटे, सुमित लंगोटे, शैलेश सुर्वे, संकेत कानपिळे, संतोष पानसरे, आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.