मंत्री भुजबळ यांच्या विंचूर कार्यालयाला भेट देत लाडक्या बहिणींकडून आभार व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या...
विंचूर, दि. १९ ऑगस्ट:-
महायुती सरकारच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल आज विंचूर येथील कार्यालयात महिलांनी भेट देत मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यात महायुती शासनाच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी अर्ज भरण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच रेशन कार्डच्या दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवून रेशन कार्डचे प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे महिलांना अर्ज करण्यास अधिक फायदा झाला. या योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील ५६ हजार महिलांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे.
त्यानंतर आज रक्षाबंधनाच्या दिवशी मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानण्यासाठी महिलांनी विंचूर येथील कार्यालयात मोठी गर्दी केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी विलास गोरे, पांडुरंग राऊत, इस्माईल मोमीन, महेंद्र पुंड, अनिल विंचूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.