“आम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळालं” छगन भुजबळांचे आभार मानताना ‘लाडक्या बहिणींचे’ उद्गार

'लाडक्या बहिणींच्या' खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात...

नाशिक/येवला- दि. १५ ऑगस्ट २०२४-

महायुती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि राज्यभरातून तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. येवला-लासलगाव मतदारसंघामधील ‘लाडक्या बहिणींच्या’ खात्यावर पैसे जमा होण्यासही सुरुवात झाली आहे. येवला शहरातील लाभार्थी संजिता अमित गाडेकर व आकांक्षा राजेश भालेराव या लाडक्या बहिणींच्या खात्यात देखील प्रत्येकी ३००० रुपये जमा झाले आहेत. पहिल्या दोन हप्त्यांची जमा झालेली ही रक्कम असून यामुळे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून येवला तालुक्यासह लासलगावमध्ये या योजनेसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. यात येवला व लासलगाव मिळून सुमारे १ लाख महिलांची नोंदणी करण्यात आली. या अभियानाअंतर्गत महिला भगिनींना नोंदणीसाठी कागदपत्रे, फॉर्म भरणे अशी सर्व प्रकारची मदत करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भुजबळ यांचे संपर्क कार्यालय आणि प्रशासन यांच्या संयुक्त मोहीम राबविण्यात आली. तसेच अजूनही गावनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करून नोंदणीचे काम सुरु आहे. यामुळे येवला तालुक्यातील महिलांना योजनेचा लाभ तातडीने मिळू शकला, अशी भावना महिला भगिनी बोलून दाखवत आहेत.


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आज दोन हप्त्यांचे ३००० रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक लाभार्थी महिलांनी सरकारचे आभार मानले. ही योजना खूप चांगली आहे आणि पुढेही ही योजना अशीच चालू राहावी, जेणेकरून आमच्या संसाराला आधार मिळेल, अशी भावना लाभार्थी महिला व्यक्त करीत आहेत.

“लाडकी बहीण योजनेंतर्गत माझ्या अकाउंटवर पैसे जमा झाल्याचा मला खूप आनंद आहे. ही योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच छगन भुजबळ यांचे आभार मानते. यामुळे माझ्या कुटुंबाला आधार मिळाला आहे. ही योजना अशीच चालू राहावी अशी मी त्यांना विनंती करते जेणेकरून भविष्यातही माझ्या कुटुंबाला आधार मिळेल.”
संजीता अमित गाडेकर
लाभार्थी, येवला

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे येवल्याचे छगन भुजबळ साहेब यांनी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार! मला आज सकाळीच मेसेज आला पैसे जमा झाल्याचा! त्यामुळे खूप आनंद झाला. रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळालं आम्हाला!”
आकांक्षा राजेश भालेराव
लाभार्थी, येवला

Leave A Reply

Your email address will not be published.