मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला-लासलगाव मतदारसंघातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा सन्मान
शासनाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे काम आदर्शवत- मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि.१० सप्टेंबर:-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची माहिती व लाभ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत पोहचविण्यात अंगणवाडी सेवका व मदतनीस यांचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादनअसे प्रतिपादन राज्याचेअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज येवला शहरातील माऊली लॉन्स येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण-अंगणवाडी सेविका मदतनीस सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, राज्यातील महिलांना सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणासह रोजगाराच्या अनेक योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याचे अधिकार यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामात प्रत्येक लाभार्थी महिलेचा अर्ज भरण्यासाठी रूपये ५० मानधन देण्यात येत आहे. आज येवला तालुक्यातील १ लाख ८ हजाउ ६३ महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात आला असून या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय अंगणवाडी सेविकांना जाते. गोर गरीबांची सेवा करण्याची संधी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिली आहे. या संधीच सोन असे ही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
बालकांना पोषण आहार, प्राथमिक शिक्षण, आरोग्य विषय सुविधा, लसीकरण, कुपोषण रोखण्याचे महत्वपूर्ण काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. त्यांचं हे काम अतिशय महत्वाचं आहे.देशाचं भविष्य घडविण्याची जबाबदारी पालकांनंतर अंगणवाडी सेविका करतात. शिक्षणासोबतच आरोग्य, पोषण आहार, लसीकरण व शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे कामही अंगणवाडी सेविक करतात त्यामुळे त्यांच्या या कामास तोड नाही अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केले.
मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना ४६ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे.महिलांच्या खात्यातून पैसे कापणाऱ्या बँकावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंत्री मंडळाने घेतला आहे. त्यामुळे योजनेचे पूर्ण पैसे महिलांना मिळणार आहे.सर्व स्तरावर महिलांचा सन्मान करण्याचं त्यांना शक्ती देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. राज्यातील १५ लाख भगिनींना लखपती दीदी बनविण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मंत्री छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमात ११ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा प्रातिनिधीक स्वरूपात मंत्री श्री.भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील यांनी केले. तर आभार महिला बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी यांनी मानले.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुण थोरात, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, सदस्य पांडुरंग शेळके, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, दत्ता निकम, राजश्री पहिलवान, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मुश्ताक शेख, अमजद शेख, अल्केश कासलीवाल, मलिक शेख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नायब तहसीलदार पंकज मगर, महिला बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकारी उपस्थित होते.