भारत जोडो यात्रेत सामील बेरोजगार युवकाच्या आईला सत्यजीत तांबेंनी फोन करून दिला धीर!

"चिंता करू नका, तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल राहणार आहे"

 

 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेने काल महाराष्ट्रात प्रवेश केला. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेची सुरुवात केली व काल रात्री उशिरा नांदेड येथील गुरुद्वारात जाऊन दर्शनही घेतले.

रात्री 11 वाजले तरी राहुल गांधी लोकांसोबत चालत होते. या यात्रेत महाराष्ट्र काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तर सामील होतेच, पण त्यासोबत भारतीय म्हणून युवा, शेतकरी, महिला, सामाजिक कार्यकर्ते असे अनेक लोक स्वतःहून सहभागी झाले होते.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी एक अनुभव त्यांच्या फेसबुक पोस्ट मधून शेअर केला आहे. या यात्रेत अनेक बेरोजगार युवा स्वतःहून सहभागी झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर वरून मोटारसायकलवर आलेले 6 तरुण सत्यजीत तांबे यांना यात्रेत भेटले. बी.ई. सिव्हिल झालेले हे तरुण अजूनही बेरोजगार असल्याने खूप अपेक्षेने ते यात्रेत सहभागी झाले होते.

त्यातल्या एका युवकाने सत्यजीत तांबे यांना विनंती केली की माझ्या आईला फोन करून तुम्ही धीर द्या, मला नोकरी नसल्याने ती खूप चिंतेत असते. यावर सत्यजीत तांबे यांनी थेट त्या युवकाच्या आईशी फोनवरून संवाद साधला व त्या माउलीला धीर दिला.

 

प्रचंड बेरोजगारी वाढत असताना राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा एक उमेद घेऊन आली आहे. त्यातच बेरोजगार युवक, शेतकरी व समाजातील सर्वच घटकांना ही यात्रा एक आशेचा किरण वाटत आहे. आता या सर्वांच्या या अपेक्षा या यात्रेतून पूर्ण होतील की ते माहीत नाही, पण केंद्रातील सरकार मात्र या यात्रेला

मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून नक्कीच गंभीर झालं आहे!

 

Leave A Reply

Your email address will not be published.