यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई | यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार देण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.उद्योजकता क्षेत्रात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जाईल.पुरस्काराचे यंदाचे पहिले वर्ष आहे.

आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कमीत कमी पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत,त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत,पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा विचार या पुरस्कारासाठी केला जाणार आहे.सामाजिक उद्योजकता (Social Entrepreneurship) या विषयात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.राज्यातील युवांसमोर उद्योजकता क्षेत्रात आदर्श ठेवणाऱ्या युवा उद्योजकांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचे पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

रुपये २१,०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.उद्योग क्षेत्रामधील मान्यवर व्यक्तींचा सहभाग असलेल्या निवड समितीमार्फत अंतिम पुरस्कारार्थींची निवड होणार आहे.

पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०२० अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व ऑनलाइन फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख बुधवार, दि.२० डिसेंबर २०२१ असून या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता संतोष मेकाले – 9860740569 या क्रमांकावर अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे व युवा अभियानाच्या राज्य संयोजन समितीने केले आहे.

उद्योजक युवा पुरस्कार ऑनलाइन फॉर्म लिंक : https://forms.gle/s7iEV3vGar7B7Npb7

Leave A Reply

Your email address will not be published.