सटाणा येथील फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांना न्याय द्या – सत्यजित तांबे

सत्यजीत तांबेंची राज्य सरकारला विनंती

सत्यजीत तांबेंची शेतकऱ्यांना न्याय देण्याची सरकारला विनंती!

नाशिक | नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेतील दोन कर्मचाऱ्यांनी ३१ शेतकऱ्यांना १ कोटी ४ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. फसवणूक झालेले शेतकरी हे बागलाण तालुक्यातील असून शेतकरी वर्गामध्ये याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली असून त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे. ट्विटमध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना याप्रकरणी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती केली आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे ते प्रमुख असल्याने त्यांच्या या मागणीला विशेष महत्त्व आहे. सत्यजीत तांबे सत्ताधारी पक्षाशी निगडित असूनही राज्यातील विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असतात. त्यांच्या या रोखठोक कार्यशैलीमुळे युवकांमध्ये त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

सटाणा येथील या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.