चऱ्होली परिसराला दिलासा! सुधीर मुंगसे यांच्या प्रयत्नांतून वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी

खेड तालुक्यातील चऱ्होली परिसरातील वीजपुरवठ्याचा दीर्घकालीन प्रश्न अखेर मार्गी लागला असून, युवा नेते सुधीर मुंगसे यांच्या प्रभावी पुढाकारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नानाश्री गार्डन रोड आणि संस्कार शाळा परिसरात अनेक दिवसांपासून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात येताच सुधीर मुंगसे यांनी तात्काळ आळंदी येथील MSEB कार्यालय गाठून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ठोस व परिणामकारक चर्चा केली.

त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केवळ तात्पुरता नव्हे, तर कायमस्वरूपी तोडगा निघाला आणि परिसर पुन्हा प्रकाशमान झाला. नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी झटणारे, शब्दांपेक्षा कृतीतून नेतृत्व सिद्ध करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सुधीर मुंगसे यांचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.