अतिवृष्टीने कोलमडलेल्या शेतकऱ्याला मंत्री भुजबळांचा आधार

शेतकऱ्यांसाठी जे शक्य, ते सर्व करू; मंत्री छगन भुजबळ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनाम्याचे आदेश; गुरुवारी प्रभावित भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार

मुंबई, २५ ऑगस्ट – येवला तालुक्यात गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी ढगफुटी देखील झाली आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील पूर्वभागासह तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याचे व लवकरात लावर नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत. तसेच मंगळवारी त्यांनी फोनवरून संपर्क साधत शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना धीर व दिलासा दिला. “हे संकट फक्त येवल्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, परंतु सरकार शेतकऱ्यांच्या मागे सरकार मजबूतीने उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

गेल्या काही दिवसांत येवला तालुक्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे सुमारे १५० गावे पाण्याखाली आली असून, शेतकी पिकांनाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, ज्यामुळे सुमारे ३१.५४ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

मंत्री भुजबळ यांनी आज सकाळी नुकसानग्रस्त झालेल्या अनेक शेतकऱ्यांशी फोनवरून थेट संवाद साधून त्यांचं म्हणणं ऐकून घेत त्यांना धीर दिला. त्यांनी शेतकऱ्यांसोबत बोलताना सांगितले, की पाऊसच इतका की पूर्ण शेती पाण्याखाली गेली. पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. अख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस कोसळतो आहे आणि मराठवाड्यापासून आपल्यापर्यंत हे सगळं जे आहे, पावसाचं एवढं प्रमाण वाढलेल आहे की सगळे शेतकरी बिचारे जे दुःखामध्ये आहे, मी ते सतत बघतो आहे.” हा भावनिक संवाद शेतकऱ्यांसाठी मोठा आधारबिंदू ठरला आहे.

मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले की ही समस्या केवळ येवला तालुक्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात अशाच प्रकारे शेतकरी दुःखी आहेत. त्यामुळे एका व्यापक दृष्टिकोनातून समस्येकडे पाहिले जाईल. “मी बैठकीला जातो जो आहे मंत्रिमंडळामध्ये, त्यावेळेला सगळे हे जे प्रश्न आहेत ते मी मांडणार आहेत आणि त्वरीत काय मदत देता येईल हे सुद्धा मी तिथे चर्चा करणार आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते आणि आर्थिक मदतीच्या विशेष योजना जाहीर करण्याचे संकेत देखील मंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “या संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आजच मंत्रिमंडळ बैठकीत देखील या समस्येवर चर्चा करणार आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित अधिकाधिक मदत कशी पोहोचवता येईल यावर विचारविनिमय करणार आहे.” मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते आणि आर्थिक मदतीच्या विशेष योजना जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे.

शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन करताना सांगितले की, ज्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले तक्रार पत्रक जिल्हा प्रशासनाकडे किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे तातडीने नोंदवावे, जेणेकरून मदतीची प्रक्रिया गतीने पूर्ण होऊ शकेल. मंत्री भुजबळ यांनी सांगितले की त्यांनी जिल्हा प्रशासनाला सर्व नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यांच्या भाषणातील भावनिक आवाहन लक्षात घेता मंत्री म्हणाले, “मराठवाड्यापासून ते कोकणापर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढलेले आहे आणि सगळे शेतकरी बंधू दु:खात आहेत हे मी सतत बघत आहे. मी मंत्रिमंडळ बैठकीत हे सगळे प्रश्न मांडणार आहे. आपण सगळ्यांनी धीर धरा. सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला शक्य तितकी सर्व मदत करणार आहे. स्वतःचा धीर सोडू नका आणि काळजी करू नका. या संकटकाळात शासन आणि प्रशासन यांचा समन्वय सुस्थापित राहील यावर मंत्री भुजबळ यांनी भर दिला आहे. शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी आणि पुनर्निर्माणासाठी सर्व आवश्यक कार्यवाही अत्यंत तातडीने केली जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.