राज्यात पहिल्यांदाच येवल्यात दिव्यांग बांधवांना सर्वाधिक मोटारचलित ट्राय सायकलचे मोफत वाटप
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते येवला-लासलगाव मतदारसंघातील १५८ दिव्यांग बांधवांना मोटारचलित ट्राय सायकलचे मोफत वाटप
नाशिक,दि. ३ मार्च :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहे. यापुढील काळातही हे काम सुरू राहील. मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी येवल्यात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि पावर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड सीएसआर योजनेंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलिम्को या संस्थेच्या वतीने येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांकरिता मोटार चलित ट्राय सायकलचे मोफत वाटप माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. पैठणी पर्यटन केंद्र येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, भारत सरकारच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर होण्यास मदत होत आहे. शासनाच्या या सर्व योजनांचा लाभ दिव्यांग बांधवांना होण्यासाठी सातत्याने होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल त्यामुळे शासनाच्या योजनांपासून कुणीही दिव्यांग वंचित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे अविरत प्रयत्न सुरू आहे. यापुढील काळात लवकरच प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र येवला कार्यालयात सुरू करण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला दोनशे ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येऊन त्यांना आवश्यक ती साधने मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच दिव्यांग बांधवांसाठी देखील नियमित तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येऊन दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेली सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अलिम्को कंपनीचे डॉ.कमलेश यादव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वाय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन संतोष खैरनार यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, प्रा.अर्जुन कोकाटे, अलिम्को कंपनीचे डॉ.किरण पावरा, डॉ.कमलेश यादव, मच्छिंद्र थोरात, मुश्ताक शेख, संतोष खैरनार, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, सरपंच श्री.निकम, बबनराव साळवे, समाधान जेजुरकर, सुनील पैठणकर, अशोक कुळधर, प्रवीण पहिलवान, भूषण लाघवे, विजय जेजुरकर, भाऊसाहेब धनवटे, संतोष जगदाळे, गोटू मांजरे, सुमित थोरात, विशाल परदेशी, संतोष राऊळ, महेश गादेकर, नितीन आहेर, गणेश गवळी, राकेश कुंभारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.