अतुल बेनके यांची गद्दारी: शरद पवारांचं नाव घेवून जनतेची फसवणूक!

जुन्नर :

जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जनतेचा विश्वास मिळवला, पण हा विश्वास मिळाल्यावर त्यांनी चक्क गद्दारी केली आणि अजित पवारांच्या सोबत गेले. गावकऱ्यांनी बेनके यांना मत देऊन शरद पवारांच्या विचारांच्या पाठिशी उभे केलं होतं, पण त्यांना अजित पवारांकडे जाऊन आपल्या मूळ पक्षाशीच नाही तर जुन्नरकरांची फसवणूक केली.

आता काय झालंय, तर शरद पवारांना मिळणारा प्रचंड जनाधार पाहून बेनके साहेब घाबरले आहेत. अजित पवारांच्या सोबत असतानाही, ते पुन्हा शरद पवारांचं नाव घेतात आणि जनतेला वेगळ्या दिशेला नेऊ पाहत आहेत. ही सरळसरळ लोकांची फसवणूक आहे. बेनके यांनी आधी पक्ष बदलला, आणि आता पुन्हा शरद पवारांचे नाव घेवून स्वतःचं राजकीय स्थान टिकवायचं आहे.

जुन्नरमधली जनता सुज्ञ आहे, बेनके यांचा हा डाव ओळखून आहेत. त्यांनी गद्दारी केली, आणि आता पवारांचं नाव वापरून जनतेला भुलवण्याचा प्रयत्न करताहेत. पण जुन्नरकर अशा फसव्या लोकांवर आता विश्वास ठेवणार नाहीत. शरद पवारांशी एकीकडे संघर्ष करत असताना, त्यांचं नाव वापरून राजकारण करणं म्हणजे लोकांची खिल्ली उडवणं आहे. बेनके यांच्या या धोरणांमुळे त्यांचा खरा चेहरा समोर आलाय, आणि जनता आता त्यांचं पाऊल ओळखून पुढचं पाऊल टाकणार आहे.

जुन्नरच्या मातीशी निष्ठा असलेले लोक आता खऱ्या नेतृत्वाचं समर्थन करतील, खोट्या आश्वासनांना आणि दिशाभूल करणाऱ्यांना फक्त घरी बसवतील.

Leave A Reply

Your email address will not be published.