प्रतिनिधी, धुळे
आमदार सत्यजीत तांबे हे आमदार झाल्यापासून अनेक तालुके व जिल्ह्यात सातत्याने दौरे करत आहेत. त्यांनी नुकताच धुळे जिल्ह्याचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान, आ. तांबेंनी विविध संस्था आणि संघटनांना भेटी दिल्या. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील अनेक नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झालेल्या दौऱ्याला धुळे शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आ. सत्यजीत तांबे हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी धुळे जिल्हा बार असोसिएशनला भेट दिली. यावेळी वकीलांचे विविध प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आ. तांबेंनी वकीलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारकडे काही महत्वपूर्ण मागण्या केल्या होत्या. या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता. त्याचबरोबर जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित सोनाबाई सीताराम पाटील बालमंदिर आणि नॅशनल उर्दू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजला भेट देत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
दौऱ्यादरम्यान धुळे येथे तयार होत असलेल्या युनोव्हेशन सेंटरच्या कामाची आ. तांबेंनी पाहणी केली. त्याचबरोबर युनोव्हेशन सेंटरच्या कामाला गती देऊन पुढील एक वर्षात काम पूर्ण करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या निवासस्थानी भेटी देत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, असे आ. सत्यजीत तांबेंनी सांगितले.
जिल्हा व तालुक्यांचा दौरा अजूनही निरंतर सुरूच
आमदार झाल्यापासून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकाच वर्षात पाच जिल्ह्यांचा आभार दौरा १५९ दिवसांत पूर्ण केला. यात ५४ तालुक्यांचा दौरा करताना १५ महिन्यात किमान १ लाख २० हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. तरी मतदारसंघाचा दौरा अजूनही निरंतर सुरूच आहे. – सत्यजीत तांबे, आमदार.