बिबट्यापासून बळीराजाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील ४८ पैकी एकच खासदार लढतोय!

पुणे,नाशिक, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर पासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग ते विदर्भापर्यंत सगळीकडेच बिबट्या – मानवी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे पूर्ण झाली, पण या कृषी प्रधान देशात उद्योगपतींना २४ तास वीज उपलब्ध होते, पण जगाची भूक भागवनाऱ्या बळीराजाला आपण आजही दिवसा थ्री फेज वीज उपलब्ध करुन देऊ शकलो नाही. देशाच्या संसदेत जिथे धोरण आखली जातात, जिथे आपल्या भागाच्या समस्या मांडण्यासाठी आपण आपले खासदार निवडून देतो, तिथे सुद्धा हा मुद्दा अनेक वेळा चर्चिला गेला, पण यावर सकारात्मक असा निर्णय आजतागायत झाला नाही. मुळात दुःख या गोष्टीचं वाटत की महाराष्ट्र देशाला ४८ खासदार निवडून देतो, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला मात्र हे खासदार पुढे येताना दिसत नाही.

आज मानव आणि बिबट्या संघर्षातून अनेक निष्पाप जीव आपण गमावले. त्यावर अभ्यासू पद्धतीने मागणी करताना एकही खासदार दिसत नाही. जेव्हा आपण तत्व निष्ठा गहाण ठेवतो, तेव्हा दिल्लीच्या तख्तासमोर स्वाभिमानाने मान उंचावून आपल्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवता येत नाही. पण किल्ले शिवनेरीचे खासदार मात्र नजरेला नजर भिडवून फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी लढतोय! शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी हा माणूस संसदेत आवाज उठवत आहे. त्यासोबतच बिबट्याच्या प्रजननावर नियंत्रण मिळवण्यासाठी धोरण आणावे यासाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत. त्यासोबतच खा डॉ अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन सुद्धा या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. खा डॉ अमोल कोल्हे यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर जुन्नर वनविभागाने प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शेतकरी राजाला नक्कीच लाभ होईल!

ज्या उर्मीने खा. डॉ अमोल कोल्हे यांनी आजवर यासाठी पाठपुरावा केला आहे, ते पाहून ते हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सुद्धा धडपड करतील, अशी आशा आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी एक तरी खासदार वाघ आहे, जो दिल्लीश्वरांना घाबरत नाही, त्यांच्या नजरेला नजर भिडवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करतोय, हे ही नसे थोडके!

Leave A Reply

Your email address will not be published.