भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार, देशमुख बाहेर येणार – संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे भाजपवर अक्षरशः तुटून पडले आहेत. “येत्या काळात भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवर केला. शिवसेना नेते व खा.संजय राऊत यांच्यावर भाजप ने केलेल्या वेगवेगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उद्या शिवसेनेची पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील सेना भवन येथे उद्या हि पत्रकार परिषद होणार आहे.
धक्कादायक! अदृश्य योगी व्यक्तीच्या सांगण्यावरुन NSE च्या CEO नी घेतले निर्णय
यावेळी खा.संजय राऊत म्हणाले मी धमक्या देणाऱ्यांना घाबरत नाही, उद्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत सगळ्यांना उत्तरं देणार, हे जे कुणी म्हणत आहेत की, “हा आत जाणार तो आत जाणार. अनिल देशमुखांच्या शेजारी आत बसणार. आम्हांला आव्हान देणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, येत्या काळात भाजपचे साडे तीन जण आतमध्ये जाणार आणि आता अनिल देशमुख जिथे आहेत तिथेच जाणार आणि अनिल देशमुख बाहेर येणार. असा हल्लाबोल राऊत यांनी भाजपवर केला. आता उद्याच्या पत्रकार परिषदेत शिवसेना काय पवित्रा घेणार आणि काय उत्तरं देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.