‘पुणे विमानतळावर छत्रपती शिवरायांचा इतिहास का नाही’ – खा.अमोल कोल्हे यांचा सवाल

‘पुणे विमानतळावर छत्रपती शिवरायांचा इतिहास का नाही’ – खा.अमोल कोल्हे यांचा सवाल

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शिरूर चे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुणे (Pune) विमानतळावर काढण्यात आलेल्या पेटिंग्जबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टमध्ये खा.कोल्हे यांनी पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात पण शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही? असा सवाल केला आहे. पुणे विमानतळावर पोहोचल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांचं लक्ष काही पेंटिंग्जने वेधले. या पेंटिंग्जसोबतचा सेल्फी आणि एक फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

ज्या पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा‌ जन्म झाला, ज्या पुण्यात‌‌ त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. त्या शिवाजी महाराजांचं कर्तृत्व पुणे विमानतळावर का दिसत नाही. शिवाजी महाराज, संभाजी‌ महाराज यांचा इतिहास सांगणारं विमानतळावर काहीच नाही, असं म्हणत याबद्दल खा.कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चा लालमहालसुद्धा आहे. सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीसुद्धा आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे. याचा पुणे एअरपोर्ट आॅथोरिटीला विसर पडला की काय, असा सवालही खासदार कोल्हे यांनी उपस्थित‌ केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.