राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

मुंबई | महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबतचा नियुक्ती आदेश आज जारी केला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं. अखेर आज या पदावर चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली.

शासन अध्यादेश
शासन अध्यादेश

महाराष्ट्रातील महिला अत्याचाऱ्याच्या वाढत्या घटना व त्यातच राज्य महिला आयोगाचं (Maharashtra State Commission for Women) अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिक्त होतं. त्यामुळे राज्य सरकारला मोठया प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत होतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला.

चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली. रुपाली चाकणकर आपल्या आक्रमक भाषणशैलीने ओळखल्या जातात. रुपाली चाकणकर यांनी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.