मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्यजीत तांबेंनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल!
प्रतिनिधी
जालन्यात मनोज जरंगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलनच्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य सरकारने केलेले मनधरणीचे सर्व प्रयत्न सपशेल अपयशी ठरले आहेत. यातच सत्यजीत तांबे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, तो व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल सुद्धा होत आहे.
यामध्ये विलासराव देशमुख आर्थिक निकषांवर आरक्षणाबाबत वक्तव्य करत आहेत. तसंच यासाठी राष्ट्रीय पक्षांनी एकत्र येत मतैक्य घडवण्याची गरजही या भाषणात त्यांनी व्यक्त केली होती.
आ. सत्यजीत तांबे यांनी जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला होता. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.
जेव्हा जेव्हा आरक्षणाची चर्चा होईल, तेव्हा विलासराव देशमुख साहेबांच्या या भाषणाची आठवण होईल, असं लिहीत आ. तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सकारात्मक प्रतिक्रिया यावर उमटत आहेत..
https://twitter.com/satyajeettambe/status/1698711118750081341?s=20