मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने येवल्यात मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक उपकरण वाटप व तपासणी शिबिराचे आयोजन
माऊली लॉन्स, येवला येथे ४ जुलै रोजी होणाऱ्या शिबिरात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर, सायकल, ब्रेल किट, स्मार्टफोन यांसारख्या जीवनोपयोगी साधनांचे मोफत वितरण; मंत्री भुजबळ यांचे लाभ घेण्याचे आवाहन
नाशिक, २९ जून २०२५: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार, तसेच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, नाशिक यांच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ४ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता येवला येथील माऊली लॉन्स येथे भरविण्यात येणार आहे.
शिबिराचे उद्दिष्ट:
या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती आणि ६० वर्षांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार विविध सहाय्यक उपकरणे व कृत्रिम अवयव मोफत पुरविण्यात येणार आहेत. यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होऊन स्वावलंबन वाढेल.
शिबिरात वाटप करण्यात येणारी साहित्ये व उपकरणे:
ज्येष्ठ नागरिकांसाठी (राष्ट्रीय वयोश्री योजना):
👉🏻व्हीलचेअर
👉🏻व्हीलचेअर विथ कमोड
👉🏻चालण्यासाठी काठ्या
👉🏻कानाची मशीन
👉🏻कंबर, गुडघा, पाठ, पट्टा यांसाठी साहाय्यक उपकरणे
👉🏻कमोड चेअर
दिव्यांग व्यक्तींसाठी (ADIP योजना):
अस्थिव्यंग (४०% किंवा अधिक दिव्यांगत्व):
👉🏻तीन चाकी सायकल (बॅटरी-ऑपरेटेड)
👉🏻व्हीलचेअर
👉🏻कुबडी सपोर्ट
👉🏻चालण्यासाठी काठ्या
👉🏻सी.पी. चेअर
👉🏻अंधत्व (१००% दृष्टीहीन):
👉🏻ब्रेल किट (विद्यार्थ्यांसाठी)
👉🏻अंध काठी
👉🏻स्मार्टफोन (इयत्ता १० पास झालेल्यांसाठी)
👉🏻सुगम्य केन (सेन्सर युक्त अंध काठी)
कर्णबधिर:
👉🏻कानाची मशीन
शिबिरातील वाटपासाठी पात्रता व आवश्यक कागदपत्रे:
ज्येष्ठ नागरिकांसाठी (६०+ वर्षे):
आधार कार्ड
उत्पन्न दाखला (मासिक १५,०००/- किंवा वार्षिक १,८०,०००/- पर्यंत)
रेशन कार्ड
👉🏻 दिव्यांग व्यक्तींसाठी:
४०% किंवा अधिक दिव्यांगत्व असलेले UDID प्रमाणपत्र
आधार कार्ड
उत्पन्न दाखला (वार्षिक २,७०,०००/- पर्यंत)
गेल्या ३ वर्षांत या योजनेअंतर्गत कोणताही लाभ घेतलेला नसावा
बॅटरी-ऑपरेटेड तीन चाकी सायकल किंवा स्मार्टफोनसाठी गेल्या ५ वर्षांत लाभ घेतलेला नसावा
मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन:
या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “ही योजना दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी आहे. सर्व योग्य लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.”
या शिबिरासाठी अधिक माहिती घेण्यासाठी समन्वयक श्री. संतोष खैरनार (९४२१६००८२०) यांच्याशी संपर्क साधावा.
ह्या उपक्रमामुळे हजारो दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यात मदत होईल, अशी अपेक्षा आहे.