भुजबळांच्या मार्गदर्शनात येवल्याचे माजी आमदार व ‘उबाठा’ नेत्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या उपस्थितीत समीर भुजबळांच्या नेतृत्वात माजी आमदार मारोतीराव पवार-संभाजी पवार यांचा शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई, १८ नोव्हेंबर : येवला विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मारोतीराव पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संभाजी पवार यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येवला तालुक्यात मोठे बळ मिळाले आहे.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार शिवाजीराव गर्जे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशापूर्वी दोन्ही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून करत पक्षप्रवेशाबाबत सविस्तर चर्चा केली.

येवला विधानसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व कायम असून त्यांची ताकद आणखी वाढत आहे. माजी आमदार मारोतीराव पवार आणि शिवसेना नेते संभाजी पवार या दोन्ही नेत्यांचा प्रवेश झाल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळाले आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा फायदा देखील होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत यांचा झाला प्रवेश

माजी आमदार मारोतराव पवार, येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रतन बोरनारे, जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब खैरनार, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अर्जुन कोकाटे,
शिवसेना उपतालुका प्रमुख व येवला माजी सभापती पुंडलिकराव पाचपुते,
येवला पंचायत समितीचे माजी सभापती प्रविण गायकवाड, येवला माजी सभापती मंगेश जाधव, येवला शिवसेना उप तालुका प्रमुख चंद्रकांत शिंदे, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गणपत भवर, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण काळे, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बापूसाहेब गायकवाड, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कांतीलाल साळवे, येवला खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दिलीपराव मेंगाळ, येवला खरेदी विक्री संघाचे संचालक भास्कर येवले, येवला पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव आठशेरे, येवला खरेदी विक्री संघाचे संचालक पी.के.काळे, येवला पंचायत समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गरुड, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक जगताप, येवला खरेदी विक्री संघाचे संचालक गंगाराम भागवत, येवला खरेदी विक्री संघाचे माजी संचालक जगन बोराडे, शिवसेना गटप्रमुख किरण बढे,
येवला खरेदी विक्री संघाचे संचालक मनोज रंधे, सरपंच प्रमोद ठोंबरे,
सरपंच शिवा पाटील खापरे, सरपंच तुकाराम गायकवाड, सरपंच सयाजी घुडघे, नंदू आबा सोमासे, समाधान चव्हाण, सरपंच सुनील साळवे, सरपंच प्रणव साळवे, सरपंच निवृत्ती घुमरे, सरपंच गोकुळ पवार, वि.का. सोसायटीचे चेअरमन जनार्दन शेजवळ, वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन निवृत्ती पाटील पवार, भाजपचे तालुका चिटणीस नारायण शिरसाठ, येवला खरेदी विक्री संघाचे संचालक ज्ञानेश्वर बोरनारे, पाटोदा माजी सरपंच साहेबराव बोराडे, पिंपरी सरपंच शाम गुंड, ठाणगाव सरपंच जनार्दन भवर, युवासेना उपतालुका प्रमुख विकास गायकवाड, सरपंच विठ्ठल जगताप, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विलास रंधे, माजी सरपंच रशीद पटेल, रवींद्र दगुजी बोराडे, अण्णासाहेब किसन बोराडे, कैलास बाळू कोल्हे, दत्तू सिताराम बोराडे, किशोर जगन्नाथ बोराडे अमोल अशोक बोराडे, विलास काटे, अनिल सैंद, भाऊसाहेब सैंद, मोहन सैद
अरुण सालमुढे, माधव कवडे, अर्जुन घुसाळे, वाल्मिक गायकवाड, सुदाम सौंदाने, गोरख सौंदाने, मंगेश आहेर, नंदू झांबरे, बाबासाहेब ढमाले, राहुल वल्टे, विशाल वल्टे, बाबासाहेब जाधव, नगरसूल माजी चेअरमन विकास निकम, लक्ष्मण कांदलकर, सरपंच भाऊसाहेब ढोणे, खामगाव सरपंच कुणाल पाटील, सरपंच डॉ.सचिन वैद्य, संतोष टिटवे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

या ऐतिहासिक राजकीय प्रवेशामुळे येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थानिक पातळीवरील उपस्थिती अधिक मजबूत होणार असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात येवला तालुक्यातील राजकीय पटलावर सकारात्मक बदल घडत असल्याचे स्थानिक निरीक्षकांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.