खेड-आळंदीच्या हक्कासाठी सुधीर मुंगसे आक्रमक; पुणे नाशिक रेल्वेसाठी लढा तीव्र!
पुणे–नाशिक रेल्वे राजगुरूनगर–चाकण मार्गे सरळ जावी, या मागणीसाठी खेड तालुक्याचे युवा नेते सुधीर मुंगसे आक्रमक झाले आहेत.
आमदार सत्यजीत तांबे यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत ठोस भूमिका मांडली. सेवेकरी सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून निवेदन सादर करत, कृती समितीच्या लढ्याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
शेती, उद्योग आणि रोजगाराला गती देणारा हा प्रकल्प सरळमार्गेच व्हावा, यासाठी मुंगसे यांचा जोरदार पाठपुरावा सुरू आहे.
“हा आपल्या खेड-आळंदीचा हक्काचा प्रकल्प असून, स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगार व व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण करणारा ठरणार आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.