सुधीरभाऊ मुंगसे यांचा वाढदिवस ठरला जनतेसाठी उपयोगी
स्वच्छतेच्या प्रश्नाला कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी श्री. सुधीरभाऊ विठ्ठल मुंगसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत स्तुत्य आणि समाजाभिमुख उपक्रम राबवला आहे.
वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळत, तब्बल ७ लाख रुपयांचा निधी स्वच्छतेसाठी देत ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून दोन कचरा गाड्या केळगाव परिसरासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
समाजाच्या गरजांना प्राधान्य देत केलेले हे कार्य केवळ कौतुकास्पदच नाही, तर इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करणाऱ्या केळगावसाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
अशा समाजहिताच्या कामांमुळे केळगावच्या वैभवात नक्कीच भर पडणार असून, श्री. सुधीरभाऊ विठ्ठल मुंगसे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.