महाकाल देवदर्शन यात्रा भक्तिभावात संपन्न!
कुरुळी जिल्हा परिषद गटातील महिला माता-भगिनींसाठी सुधीर मुंगसे यांचा स्तुत्य उपक्रम!
पुणे, १७ सप्टेंबर – ‘मी सेवेकरी सोशल फाऊंडेशन’ आणि ‘सुधीर मुंगसे मित्रपरिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा सोमवारी, १५ सप्टेंबरपासून बुधवार, १७ सप्टेंबरपर्यंत मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने यशस्वीरीत्या पार पडली.
या यात्रेदरम्यान महिलांनी श्री महाकालेश्वर मंदिरासह कालभैरव व मंगलनाथ मंदिर यांसारख्या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले. संपूर्ण प्रवास निःशुल्क रेल्वेमार्गे सोयीस्कर रीतीने पूर्ण झाला. उज्जैन येथे ‘मेरे महाकाल सरकार’ या गीताचे सुप्रसिद्ध गायक श्री. सनी अलबेला यांच्या संगीत रजनी चा बाबा महाकाल च्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाविकांना या कार्यक्रमाचा सुद्धा मोठ्या उत्साहाने आनंद घेतला.
स्त्रीशक्तीचा आदर, तिच्या त्यागाचा सन्मान आणि तिच्या आध्यात्मिक भावविश्वाला जोड देण्याचा एक प्रामाणिक उपक्रम म्हणून ही यात्रा ठरली. महिलांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या यात्रेचे पुढील टप्प्यात पुनरायोजन करण्याची तयारी आयोजकांनी व्यक्त केली आहे.
ही महाकाल दर्शन यात्रा महिलांच्या श्रद्धेला नवसंजीवनी देणारी आणि समाजातील स्त्रीशक्तीला अभिवादन करणारी ठरल्याचे मत सहभागी भाविकांनी व्यक्त केले.