अहिल्यानगर :नेवासे तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते. आता ग्रामसभेने आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली आहे.

अहिल्यानगर :नेवासे तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते. आता ग्रामसभेने आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली आहे.

सौंदाळा येथे शिव्या देण्यावर बंदीचा ठराव मंजूर, ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाईचा ग्रामसभेत निर्णय

राहाता : नेवासे तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते. आता ग्रामसभेने आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली आहे. जो शिव्या देईल त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. असे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.

सौंदाळा येथे झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. जर शिव्या दिल्या तर ५०० रुपये दंड सक्तीने आकारला जाईल. शिव्या देताना आईचा व बहिणीचा कुठलाही दोष नसताना त्यांच्या शारीरिक अवयव संदर्भात शिवीगाळ करून अर्वाच्य शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो. त्यामुळे शिव्या देणाऱ्या व्यक्तीने शिव्या देताना आपल्या आई, बहिणींना व मुलीला आठवले पाहिजे. त्यामुळे ग्रामपंचायतीने शिव्या देण्यावर बंदी घालून महिला भगिनींचा सन्मान करण्यात येत आहे, असे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.