सत्यजीत तांबेंनी आयोजित केलेल्या जयहिंद लोकचळवळीच्या जागतिक परिषदेत पायाभूत सुविधातज्ज्ञ सुनील रोहोकले यांनी लावली हजेरी!
प्रतिनिधी,
बदलत्या काळानुसार विभक्त कुटुंब पद्धतीची वाढ झालेली दिसत आहे. यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातही एकटेपणाचे प्रमाण जास्त आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आगामी काळात ‘तीन पिढ्यांसाठी घरं’ हा ट्रेंड बांधकाम क्षेत्रात प्रसिद्ध होईल, असे मत पायाभूत सुविधातज्ज्ञ सुनील रोहोकले यांनी व्यक्त केले आहे.
जयहिंद लोकचळवळ आयोजित ग्लोबल कॉन्फरन्समधे ‘पायाभूत सुविधा क्षेत्रात शाश्वत विकासाचा लोकांचा अधिकार’ या विषयावर ते बोलत होते.
महाराष्ट्रात दरवर्षी जयहिंद लोकचळवळ आयोजित जागतिक परिषद होते. गेल्या अनेक वर्षांपासून जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, व्यवसाय कृषी यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर काम केले जात आहे.