सत्यजीत तांबेंच्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये चर्चा दिल्ली-पंजाबच्या शाळांची

 

 

प्रतिनिधी,

केंद्र सरकारने निधीची तरतूद न करता शिक्षण धोरणाची घोषणा केली आहे. निधीशिवाय या धोरणाची अंमलबजावणी कशी होणार? असा प्रश्न शिक्षणतज्ज्ञ शैलेंद्र शर्मा यांनी उपस्थित केला. ते जयहिंद लोकचळवळ ने आयोजित केलेल्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये बोलत होते. सत्यजीत तांबे यांनी आयोजित केलेल्या या कॉन्फरन्स मधूनच त्यांनी केंद्र सरकारला खडे बोल सुनावले.

 

या कॉन्फरन्स मध्ये शैलेंद्र शर्मा यांनी दिल्ली व पंजाब सरकारने उभारलेल्या आदर्श शाळांच्या मॉडेलवर चर्चा केली. दिल्ली व पंजाब सारख्या राज्यात शिक्षकांवर इतर कामे लादली जात नाहीत. त्यामुळे दिल्लीत शिक्षक विद्यार्थ्यांवर जास्त लक्ष ठेवतो, असेही शर्मा म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.