सत्यजीत तांबे यांच्या जयहिंद लोकचळवळ संघटनेमुळे ‘पेमगिरी’ गावाची प्रगतीकडे वाटचाल !

संगमनेर :  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात जयहिंद लोकचळवळ ही संघटना चर्चेत आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात मागील काही दिवसांमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी संघटनेच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.

जयहिंद लोकचळवळ शिक्षण, रोजगार व उद्योजकता विकास, शेती, पर्यावरण संवर्धन, क्रीडा, वाचन, कला, सुदृढ ग्राम-शहर, आरोग्य या विषयांवर राज्यभरात काम करते. ग्रामीण भाग तसेच शहरातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी जयहिंद लोकचळवळ ‘सुदृढ ग्राम’ अंतर्गत विविध उपक्रम राबवते. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावात जयहिंद लोकचळवळ च्या प्रयत्नांतून गावाचा ऐतिहासिक कायापालट करण्यात आला आहे.

शेती, पर्यावरण, शिक्षण, क्रीडा या विषयांवर पेमगिरी गावात अनेक विकासकामे मागील काही काळात पूर्णत्वास आली आहेत. सिमेंट बंधारे दुरुस्ती, स्लरी टँक, आंबा लागवड, माती नाला खोलीकरण, रेशीम शेती, एकात्मिक शेती, क्रीडांगण निर्मिती, महिलांसाठी बचतगटाच्या माध्यमातून विविध कामे तसेच इतर कामांचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 35 विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी जवळजवळ 50 हजार रूपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. शेतीसाठी केलेल्या कामांमुळे सध्या शेतकऱ्यांना पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे. जयहिंद लोकचळवळमुळे गावात झालेल्या ऐतिहासिक कामांबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.