शेळगाव गटात विकासाची गती—शरद पवारांच्या नेतृत्वात उंडेगाव रस्ता सुरू
उंडेगाव (ता. परांडा)
आज शेळगाव गटातील उंडेगाव येथे झालेल्या गावभेट दौऱ्यात उद्योजक शरद रामदास पवार यांनी उंडेगाव–रत्नापूर–शिव रस्त्याच्या कामाला स्वखर्चातून सुरुवात करून त्याचे भव्य उद्घाटन केले. स्थानिक नागरिक, युवा वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या रस्त्याच्या उभारणीमुळे दळण–वळणात सुधारणा, प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून उंडेगाव परिसरातील विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या उपक्रमामुळे शेती, व्यवसायासाठी जाण्या-येण्याचा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
उंडेगावच्या विकासासाठी हाती घेतलेल्या या कामामुळे गावकऱ्यांनी शरद पवार यांचे मनःपूर्वक कौतुक केले. “स्वखर्चातून लोकांच्या गरजांकडे लक्ष देणारा नेता आजपर्यंत पाहिला नव्हता” अशी स्पष्ट भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शेळगाव गटात शरद पवार यांनी गेल्या काही महिन्यांत रस्ते, पायाभूत सुविधा आणि गावांच्या मूलभूत गरजांवर सातत्याने काम केल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास वाढत चालला आहे.
स्थानिक नागरिकांचे मत आहे की, विकासाच्या या कामांना जास्त बळ मिळावे म्हणून जिल्हा परिषदेत त्यांना संधी दिली पाहिजे, जेणेकरून उंडेगाव व परिसरातील बाकी प्रलंबित कामेही वेगाने पूर्ण होतील.
“विकासाची भाषा कामातूनच बोलते, आणि शरद पवार हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत.” — असे मत शेळगाव गटातील नागरिकांनी व्यक्त केले.