शेळगाव गटाचा मजबूत आधार—जनसेवक शरद पवार यांच्या स्वखर्चातून पुलाची दुरुस्ती
चिंचपूर ते लंगोटवाडी व सक्करवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. रोजच्या प्रवासात या पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत होता. या गंभीर परिस्थितीची जाण ठेवत शेळगाव जिल्हा परिषदचमतदारसंघाचे नेते शरद पवार यांनी तात्काळ पुढाकार घेत स्वखर्चातून मुरूम व जेसीबीच्या सहाय्याने पुलाची दुरुस्ती पूर्ण केली.
या कामामुळे प्रवासी, शेतकरी, विद्यार्थी आणि रोजंदारी करणाऱ्या नागरिकांचा प्रवास आज सुरक्षित आणि सुकर झाला आहे. जनतेची अडचण जाणून कोणत्याही सरकारी कागदोपत्री प्रक्रिया न पाहता त्वरित उपाय करणारी ही भूमिका शरद पवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाची आणि लोकाभिमुख कामाची साक्ष देते.
शेळगाव गटातील नागरिकांसाठी “काम हेच उत्तर” या तत्त्वावर काम करणारे शरद पवार यांचे हे पाऊल केवळ पुलाची दुरुस्ती नाही, तर जनतेला सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा मजबूत पूल आहे अश्या भावना जनतेतून उमटत आहेत.