शिक्षण विभाग काय प्रयोगशाळा आहे का? सत्यजीत तांबे संतापले!
प्रतिनिधी
राज्य सरकारने कंत्राटी भरती करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे शिक्षक होऊन देशाची भावी पिढी घडविण्याच युवकांच स्वप्न धुळीस मिळालं आहे. जर शिक्षक कंत्राटी पद्धतीने निवडले तर हा निर्णय फक्त युवकच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा हानिकारक आहे.
या मुद्यावरून सत्यजीत तांबे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. शालेय व आरोग्य विभागात असे नको ते प्रयोग करणं हे भविष्यातील पिढीसाठी घातक असल्याचं स्पष्ट व परखड मत त्यांनी व्यक्त केले. त्यासोबतच हे असे प्रयोग सरकार कडून होत राहिले तर शिक्षण क्षेत्र व विद्यार्थ्यांचं कधीही भरून न निघणार नुकसान अटळ असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
शिक्षण विभाग ही काय प्रयोगशाळा नाही, त्यामुळे युवक व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असे प्रयोग करून खेळू नका, असं आवाहन सत्यजीत तांबे यांनी सरकारला केले आहे.
सत्यजीत तांबे यांच्या परखड भूमिकेचे राज्यभरातून स्वागत करण्यात येत आहे.