‘विनायकी’ गौरव शिष्यवृत्ती उपक्रमाच्या आयोजनासंदर्भात पत्रकार परिषद

‘विनायकी’ गौरव शिष्यवृत्ती उपक्रमाच्या आयोजनासंदर्भात पत्रकार परिषद

पुणे, 3 जुलै 2025 — कार्यसम्राट आमदार विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने ‘विनायकी’ गौरव शिष्यवृत्ती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील मान्यवर पत्रकारांना या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

पत्रकार परिषद शुक्रवार, 4 जुलै 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता श्रमिक पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे पार पडणार आहे. या वेळी उपक्रमाचे उद्दिष्ट, पात्रता निकष, लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया आणि वितरणाचा कार्यक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

‘विनायकी’ उपक्रमामार्फत होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ती आर्थिक मदत करण्यात येणार असून, आमदार विनायक निम्हण यांच्या सामाजिक जाणिवेचा हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या पत्रकार परिषदेला मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण, सामाजिक कार्यकर्ते उमेश वाघ, बिपीन मोदी व अमित मुरकुटे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.