विनायकी क्रीडा महोत्सव २०२५: पुण्यातील युवा खेळाडूंसाठी स्पर्धात्मक पर्व!
मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण व सोमेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनायकी क्रीडा महोत्सव २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे
पुणे | प्रतिनिधी
स्व. कार्यसम्राट मा. आमदार विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण व सोमेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनायकी क्रीडा महोत्सव २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील खेळाडूंना एक हक्काचं स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम करण्यात येणार आहे.
या महोत्सवात खालील खेळांच्या स्पर्धा पार पडणार आहेत:
🔹 बॅडमिंटन – १, २, ३ ऑगस्ट
स्थळ: द लाइफ स्पोर्ट्स अकादमी, सोमेश्वरवाडी
🔹 बुद्धिबळ – ३ ऑगस्ट
स्थळ: गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वरवाडी
🔹 कॅरम – ८, ९, १० ऑगस्ट
स्थळ: गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वरवाडी
या स्पर्धांद्वारे पुण्यातील युवा खेळाडूंना स्वतःची गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळणार आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून खेळ, फिटनेस आणि सुसंवाद यांना चालना देण्याचा प्रयत्न सनी विनायक निम्हण सातत्याने करत आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 📞 संपर्क: 8308123555