राज्यातील मालमत्ता करावर लागणारा दंड २४ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणणार : अजित पवार
राज्यातील मालमत्ता करावर लागणारा दंड २४ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणणार : अजित पवार यांची मोठी घोषणा
राज्यातील मालमत्ताकरांच्या थकबाकीदारांना राज्य सरकारकडून दिलासा मिळणार आहे. मालमत्ता कर थकल्यास राज्यातील महानगरपालिका वर्षाला तब्बल २४ टक्के इतके प्रचंड व्याज सामान्य नागरिकांकडून आकारत आहे. काल ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बैठकीत सांगण्यात आली. यासंदर्भात पवार यांनी तात्काळ आपल्या सचिवांशी बोलणे करून व्याज दर २४ टक्क्यांऐवजी १२ टक्के व्याज करण्यासाठी कॅबिनेट नोट सादर करण्यास सांगितलं. या प्रस्तावावर महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते बसून योग्य निर्णय घेऊन तसे निर्देश सर्व महापालिकांना दिले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.